राष्ट्रीय

राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार! प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढवणार

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते यांनी रायबरेली जागा कायम ठेवली असून त्यांनी केरळमधील वायनाड जागेचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे आता वायनाड लोकसभा मतदारसंघातील फेर निवडणूक प्रियंका गांधी लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. सोमवारी (दि. 17) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत माहिती दिली.

केंद्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर 24 जूनपासून संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधी सोमवारी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी आणि केसी वेणुगोपाल उपस्थित होते. यामध्ये लोकसभा अध्यक्ष आणि उपसभापती निवडीबाबत चर्चा झाल्याचे समजते आहे.

दरम्यान, वायनाड आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांच्या एका जागेवरही निर्णय घेण्यात आला. ज्यात रायबरेलीची जागा कायम ठेवून वायनाडच्या जागेचा राजीमाना देण्याचे निश्चित झाले. याबाबत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यासोबतच प्रियांका गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT