राष्ट्रीय

पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक; अधिकाऱ्यांवर कारवाई

मोहन कारंडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्यावर्षीच्या जानेवारी महिन्यातील पंजाब दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत घोडचूक केल्याबद्दल तत्कालीन पोलिस महासंचालक एस. चट्टोपाध्याय यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. पंजाबच्या मान सरकारने याप्रकरणी शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश जारी केले आहेत.

जानेवारी २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर असताना फिरोजपूर येथे त्यांच्या पंजाबच्या दौऱ्यावर असताना फिरोजपूर येथे त्यांच्या मार्गावर आंदोलक शेतकरी उतरले होते व त्यांची वाहने पंतप्रधानांच्या वाहनाच्या दिशेने येत होती. पंतप्रधानांचा ताफा फिरोजपूरच्या फ्लायओव्हरवर १५ ते २० मिनिटे थांबला होता. या प्रकारानंतर पंतप्रधान दिल्लीला रवाना झाले. याबाबत केंद्र सरकारने पंजाब सरकारला चौकशी करून कृती अहवाल देण्यास सांगितला होता. त्यानुसार मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

SCROLL FOR NEXT