नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी (दि.२९) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची शिष्टाचार भेट घेतली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी दोन्ही मान्यवरांना महाकुंभमेळ्याचे आमंत्रण दिले.
उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी जोरदार तयारी केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभमेळ्याचे आमंत्रण देण्यासाठी गेले दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. यापूर्वी त्यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेऊन महाकुंभमेळ्याचे आमंत्रण दिले. दर बारा वर्षांनी महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. यंदाचा महाकुंभमेळा १३ जानेवारीपासून सुरू होईल आणि २६ फेब्रुवारी २०२५ रोजी संपेल. महाकुंभमेळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.