Kerala coast explosion Pudhari
राष्ट्रीय

Kerala coast explosion | केरळच्या किनाऱ्याजवळ सिंगापूरच्या जहाजावर शक्तिशाली स्फोट...

Kerala coast explosion | कोलंबोहून मुंबईकडे येत असताना मालवाहू जहाजात स्फोट

Akshay Nirmale

Kerala coast explosion Singapore-flagged vessel Container ship MV Wan Hai 503 blast Indian Navy response

मुंबई/कोची : केरळच्या किनाऱ्याजवळ सोमवारी सकाळी सिंगापूर ध्वजाखालील मालवाहू जहाज MV Wan Hai 503 वर एक भीषण स्फोट झाला. हे जहाज कोलंबो (श्रीलंका) येथून 7 जून रोजी निघाले होते आणि 10 जून रोजी मुंबईत पोहोचण्याचे नियोजन होते, अशी माहिती संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्यांनी (Defence PRO) दिली आहे.

सुमारे 270 मीटर लांब व 12.5 मीटर खोल असलेले हे कंटेनर जहाज केरळच्या समुद्रकिनाऱ्याजवळ असताना सकाळी 10.30 वाजता जहाजाच्या अंतर्गत भागात (underdeck) स्फोट झाला. या स्फोटाची माहिती मुंबई येथील Maritime Operations Centre (MOC) ने कोचीतील त्यांच्या समकक्ष केंद्राला दिली.

या घटनेनंतर, भारतीय नौदलाने तात्काळ INS Surat या युद्धनौकेला कोचीला जाण्याऐवजी स्फोटग्रस्त जहाजाच्या दिशेने वळवले. पश्चिम नौदल कमांडने सकाळी 11 वाजता हा आदेश दिला. तसेच, कोची येथील INS Garuda या नौदल विमानतळावरून एक Dornier विमान पाठवण्याचीही तयारी सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून हवेतून परिस्थितीचे आकलन करता येईल व आवश्यक मदत समन्वय साधता येईल.

आतापर्यंत जिवीतहानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नौदलाकडून मदतकार्य सुरू असून जहाजाच्या चालक व कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना केली जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT