कोलकाता : कोव्हिडच्या महामारीनंतर बदललेल्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये ब्रेन स्ट्रोकचा धोका झपाट्याने वाढत असल्याचे न्यूरो तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. ब्रेन स्ट्रोक आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिला नाही. कोव्हिड महामारीनंतर आपण चालणे कमी केले, व्यायामाकडे दुर्लक्ष केले आणि यंत्रांवर अवलंबून राहिलो आहोत, असे इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस, कोलकाता येथील संचालक डॉ. अप्रतीम चॅटर्जी यांनी सांगितले.
उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढत आहे. दर चार व्यक्तींपैकी एकजण या आजाराच्या जोखमीमध्ये आहे, असे डॉ. चॅटर्जी म्हणाले. डॉ. आर. पी. सेनगुप्ता यांनी सांगितले की, स्ट्रोक झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत उपचार सुरू केल्यास रुग्ण बरा होऊ शकतो.