जुने संसद भवन Pudhari File Photo
राष्ट्रीय

राजकीय पक्ष आणि संसदीय समित्यांची कार्यालयासाठी जुन्या संसद भवनाला पसंती

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

संसदेची नवीन इमारत होऊनही राजकीय पक्ष संसदेतील कार्यालयासाठी जुन्या संसद भवनाला पसंती दिली आहे. अनेक राजकीय पक्षांच्या वतीने लोकसभा सचिवालयाला पत्रही लिहिले होते. त्यानुसार काही राजकीय पक्षांना जुन्या संसद भवनात कार्यालयेही देण्यात आली आहेत. त्यानंतर आता संसदीय समित्यांच्या अध्यक्षांनीही जुन्या संसद भवनात कार्यालयाची मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि माहिती-प्रसारण मंत्रालयाशी संबंधित संसदीय समित्यांच्या अध्यक्षांनी संविधान सभेत स्वत:साठी कार्यालयाची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी लोकसभा सचिवालयाला पत्र लिहिले आहे.

साधारणपणे संसदीय समित्यांना संसदीय सभागृहात कार्यालये दिली जातात. जुन्या संसदेच्या इमारतीत फक्त लोकलेखा समिती आणि अंदाज समितीला कार्यालयाची जागा देण्यात आली आहे. संसदीय समित्यांच्या अध्यक्षांनी त्यांच्या कार्यालयासाठी जुन्या संसदेत एका खोलीची मागणी केली आहे. वास्तविक, जुनी संसद हे संसदेच्या नवीन इमारतीच्या जवळच आहे. जुन्या संसदेतून नव्या संसद भवनापर्यंत पोहोचणे सोपे आहे. त्यामुळे बहुतांश राजकीय पक्ष आणि संसदीय समित्यांची त्यांच्या कार्यालयांसाठी जुनी संसद ही पहिली पसंती राहिली आहे.

तृणमूल काँग्रेस, द्रमुकची जुनी कार्यालये कायम राहणार

तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकने नवीन संसद भवन आणि जुने संसद भवन या दोन्ही ठिकाणी कार्यालयांची मागणी केली होती. त्यासाठी पत्रही लिहिले होते. मात्र लोकसभा सचिवालयाने त्यांना दोन्ही ठिकाणी कार्यालये देण्यास नकार दिला आहे. लोकसभा सचिवालय त्यांना त्यांच्या जुन्या कार्यालयात मान्यता देणार आहे. याबाबतचे पत्र येत्या सोमवारी जारी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तृणमूल काँग्रेसचे कार्यालय जुन्या संसदेच्या खोली क्रमांक २० बी मध्ये आहे आणि द्रमुकचे कार्यालय खोली क्रमांक ४६ मध्ये आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT