छत्तीसगडच्या गंगालूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; ८ नक्षलवादी ठार (file photo)
राष्ट्रीय

छत्तीसगडमध्ये चकमक; ८ नक्षलवादी ठार

गोपनीय माहितीवरून पोलिसांची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन :

छत्तीसगडच्या गंगालूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्‍या चमकमकीत ८ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. गंगालूरमध्ये नक्षली दबा धरून बसल्‍याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्‍यावरून पोलिसांनी ही कारवाई केली. गंगालूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सकाळपासून चकमक सुरू होती. यामध्ये ८ नक्षलवादी ठार झाले आहेत.

डीआरजी, एसटीएफ, कोबरा, सीआरपीएफ 222 यांची संयुक्त टीम नक्षलविरोधी अभियान राबवित असताना ही चकमक झाली. सदर क्षेत्रात नक्षल दबा धरून बसले असल्याची माहिती मिळाली होती. ज्वाइंट ऑपरेशनने सकाळ पासूनच पोलीस आणि नक्षल यांच्यात चकमक सुरु होती. यामध्ये 8 नक्षली मारले गेले व अन्य सामग्री हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT