पंतप्रधान नरेंद्र मोदी. (Source- Narendra Modi | X account)
राष्ट्रीय

PM Modi Canada Visit | पीएम मोदी चार दिवस विदेश दौऱ्यावर, कॅनडासह सायप्रस, क्रोएशियाला भेट देणार

पीएम मोदी G-7 शिखर परिषदेत सलग सहाव्यांदा सहभागी होणार

दीपक दि. भांदिगरे

PM Modi Canada Visit

पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडातील कनानास्किस येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांनी पीएम मोदी यांना या परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. त्यासाठी पीएम मोदी १६ ते १७ जून दरम्यान कॅनडाच्या दौऱ्यावर असतील. विशेष म्हणजे ते G-7 शिखर परिषदेत सलग सहाव्यांदा सहभाग होत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

या शिखर परिषदेत पीएम मोदी जी-७ देशांचे नेते, इतर निमंत्रित देश तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांशी ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कल्पना, विशेषतः एआय-ऊर्जा संबंध आणि क्वांटम तंत्रज्ञान संबंधित महत्त्वांच्या मुद्यांवर चर्चा करतील. शिखर परिषदेदरम्यान पीएम मोदींच्या अनेक द्विपक्षीय बैठकाही होतील.

भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्ण संबंधामुळे पीएम मोदी जी-७ शिखर परिषदेला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा सुरु होती. पण कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांनी पंतप्रधान मोदींना जी-७ शिखर परिषदेचे निमंत्रण दिले आहे.

पीएम मोदींचा सायप्रस, क्रोएशिया दौरा

त्यापूर्वी सायप्रस प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्या निमंत्रणावरून पीएम मोदी १५ ते १६ जून दरम्यान सायप्रसला अधिकृत भेट देतील. दोन दशकांच्या काळातील भारतीय पंतप्रधानांचा सायप्रसचा पहिलाच दौरा असेल. सायप्रसमधील निकोसियामध्ये पीएम मोदी क्रिस्टोडौलिडेस यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच ते लिमासोलमध्ये उद्योजकांना संबोधित करतील. या त्यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील. तर पीएम मोदी १८ जून रोजी क्रोएशिया दौऱ्यावर असतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT