छत्रपती शिवाजी महाराजांकडून समृद्ध भारतासाठी प्रेरणा; PM मोदींनी शेअर केला व्हिडिओ  file photo
राष्ट्रीय

छत्रपती शिवाजी महाराजांकडून समृद्ध भारतासाठी प्रेरणा; PM मोदींनी शेअर केला व्हिडिओ

Shiv Jayanti 2025 | शिवरायांना केले अभिवादन

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shiv Jayanti 2025 | रयतेचे स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींचा जयंती सोहळा आज राज्यासह देशभरात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. शिवजयंतीनिमित्त अवघा महाराष्ट्र शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवजयंतीनिमित्त एक खास व्हिडिओ पोस्ट करून शिवरायांना अभिवादन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने भारत घडवण्यासाठी प्रेरणा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असे पतंप्रधान नरेद्र मोदी यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT