Mahakumbh 2025 PM Modi Visit | महाकुंभमेळ्याला पंतप्रधान मोदी लावणार हजेरी  file photo
राष्ट्रीय

Mahakumbh 2025 PM Modi Visit | महाकुंभमेळ्याला पंतप्रधान मोदी लावणार हजेरी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १० फेब्रुवारी रोजी राहणार उपस्थित

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mahakumbh 2025 PM Modi Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारीला महाकुंभमेळ्याला भेट देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २७ जानेवारी रोजी तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड १ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्याला भेट देणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १० फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्याला उपस्थित राहणार आहेत.

महाकुंभ सुरू होऊन ९ दिवस झाले आहेत. या काळात सुमारे ९ कोटी लोकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या महाकुंभात एकूण ६ स्नान होणार आहेत, त्यापैकी तीन अमृत स्नान आहेत. तीन अमृत स्नानांपैकी एक आधीच झाले आहे, ज्यामध्ये सुमारे साडेतीन कोटी लोकांनी भाग घेतला होता. १३ वेगवेगळ्या आखाड्यांमधील संत आणि साधू देखील होते. महाकुंभात दररोज सुमारे १० लाख भाविक गंगा नदीत स्नान करतात. १९ जानेवारीपर्यंत ८.२६ कोटी लोकांनी संगमात स्नान केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT