World Wildlife Day : पंतप्रधान मोदींनी घेतला गीरमध्ये जंगल सफारीचा आनंद File Photo
राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींनी घेतला गीरमध्ये जंगल सफारीचा आनंद

World Wildlife Day : आशियाई सिंहांमध्ये 'जागतिक वन्यजीव दिन' केला साजरा

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या सासन येथील गीर राष्‍ट्रीय उद्यानात 'जागतिक वन्यजीव दिन' साजरा केला. त्‍यांनी गीर राष्‍ट्रीय उद्यानाची सफारी केली. पंतप्रधान बनल्‍यानंतर सासन आणि सफारीचा पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच कार्यक्रम होता. (WorldWildlifeDay)

गुजरातचा मुख्यमंत्री असताना त्‍यांनी सासनला जगातील मोठ्या पर्यटन स्‍थळाच्या स्‍वरूपात ओळख मिळवून दिली. सफारीनंतर सकाळी १० वाजता ते सासनच्या सिंह सदन मध्ये वन्य जीव बोर्डसोबत बैठक घेणार आहेत. ज्‍यामध्ये एकुण ४७ सभासद आहेत. यामध्ये सैन्य प्रमुख, विविध राज्‍यांचे सदस्‍य, एनजीओ, वन सचिव आदींचा समावेश आहे. यानंतर ते दुपारी १२ वाजता सोमनाथ मंदिरात जातील. या ठिकाणी सोमनाथाचे दर्शन झाल्‍यानंतर पंतप्रधान मोदी हे दुपारी ३ वाजता दिल्‍लीसाठी रवाना होणार आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदींनी आशियाई सिंहांचे एकमेव घर असलेल्या सासन गीरच्या विकासासाठी मोठे निर्णय घेतले होते. ज्‍यामुळे आज देश-विदेशातून लाखो पर्यटक सासर गीरमध्ये सिंह दर्शनासाठी येतात. सध्या गुजरातच्या ९ जिल्‍ह्यांमध्ये ५३ तालुक्‍यांत जवळपास ३०,००० चौरस किलोमीटर परिसरात सिंहांचा वावर आहे.

मुख्यमंत्री असताना केले प्रयत्‍न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या सासन गीरमध्ये राहणाऱ्या सिंहांच्या संरक्षणासाठी आणि गीरच्या समग्र विकासासाठी अनेक स्‍तरावर प्रयत्‍न केले. त्‍यांनी स्‍वत:हा २००७ मध्ये गीर वनक्षेत्राचा दौरा केला होता आणि तेथील परिस्‍थितीचा माहिती घेतली होती. यानंतर मोदी यांनी गीरच्या सर्वांगिण विकास सिंहासह अन्य वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विविध उपययोजनांची अंमलबजावणी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT