PM Kisan 20th Installment  (file photo)
राष्ट्रीय

PM Kisan 20th Installment | शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; पीएम किसान सन्मान निधीचा २० वा हप्ता बँक खात्यात जमा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून एका क्लिकद्वारे पीएम किसान सन्मान निधीचा २० हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला

दीपक दि. भांदिगरे

PM Kisan 20th Installment

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी शनिवारी (दि. २ ऑगस्ट) मोदी सरकारने खुशखबर दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून एका क्लिकद्वारे पीएम किसान सन्मान निधीचा २० हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला. यावेळी शेतकऱ्यांना २ हजार रुपयांच्या हप्त्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागली.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते आज वाराणसीमध्ये सुमारे २,२०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले.

पीएम मोदी यांनी आज वाराणसी येथील कार्यक्रमातून योजनेचा २० वा हप्ता जारी केला. २०१९ मध्ये पीएम-किसान योजना सुरू झाल्यापासून, १९ हप्त्यांमध्ये ३.६९ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. २० व्या हप्त्यात, ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २० हजार ५०० कोटी रुपये डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात आले.

पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेली मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत, दरवर्षी ६ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) पद्धतीने शेतकऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाते.

याआधी, पीएम मोदींनी २४ फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा १९ वा हप्ता जारी केला होता. यातून देशभरातील सुमारे ९.८ कोटी शेतकऱ्यांना २२ हजार कोटी हस्तांतरित करण्यात आले आहेत.

दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या सुमारे ८५ टक्के भारतीय शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना ही मोठी आधार ठरली आहे. पेरणी अथवा कापणीच्या वेळी, रोख रकमेची गरज भासते. अशावेळी हे पैसे उपयोगी पडतात.

एआय चॅटबॉट देतो शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे

२०२३ मध्ये पीएम किसान योजनेसाठी एआय चॅटबॉट लाँच करण्यात आला. हा एआय चॅटबॉट शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची त्वरित, स्पष्ट आणि अचूक उत्तरे देऊन मदत करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT