Narendra Modi | पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीची तारीख आणि ठिकाण ठरलं (File Photo)
राष्ट्रीय

पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीची तारीख आणि ठिकाण ठरलं!

Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा पहिलाच द्विपक्षीय अमेरिका दौरा

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : PM Modi US Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १३ फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टनमध्ये भेटणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापासून ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेटीबद्दल अटकळ बांधली जात होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच द्विपक्षीय अमेरिका दौरा असेल. याव्यतिरिक्त, ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर काही आठवड्यांतच वॉशिंग्टन डीसीला द्विपक्षीय भेटीसाठी जाणारे निवडक परदेशी नेत्यांमध्येगी पंतप्रधान मोदी असतील. ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभानंतर, पंतप्रधान मोदींनी २७ जानेवारी रोजी त्यांच्याशी संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी व्यापार, ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात भारत-अमेरिका सहकार्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याबाबत चर्चा केली होती.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचा नियोजित पॅरिसचा दोन दिवसांचा दौरा संपवल्यानंतर वॉशिंग्टन डीसीला जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारत आणि अमेरिका दोन्ही देशांमधील भागीदारी आणखी दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यासाठी प्रयत्न करत आहेत. तथापि, भेटीच्या नेमक्या तारखा अद्याप निश्चित केलेल्या नाहीत. भारत आणि अमेरिका १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पंतप्रधानांच्या भेटीसाठी वेळ घेत आहेत, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT