PM Modi  Pudhari
राष्ट्रीय

PM Modi on Delimitation Bill : "भारताची प्रगती नारीशक्तीच्या स्वप्नांशी निगडित; परिसीमन विधेयकापूर्वी पंतप्रधान मोदींचा संदेश

PM Modi on Delimitation Billमहिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा शब्द पाळण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार

पुढारी वृत्तसेवा

PM Modi on Delimitation Bill : देशाची प्रगती ही नारीशक्तीच्या स्वप्नांच्या भरारीशी थेट जोडलेली आहे, असा संदेश देणारा व्‍हिडिओ संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे. संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा शब्द पाळण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

महिला आरक्षणाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले जातील

राजकारणात महिलांना हक्काचे स्थान मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून लढा सुरू असून, आपण स्वतः या लढ्यात सहभागी राहिलो असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. महिला आरक्षणाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले जातील, असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी केला आहे.

आमच्यासाठी राष्ट्रीय हित सर्वोपरि

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) वचनबद्धता ठाम आहे. आमच्यासाठी राष्ट्रीय हित सर्वोपरि आहे. मात्र, जेव्हा काहींसाठी स्वतःच्या राजकीय पक्षाचे हित हेच सर्वस्व बनते—आणि ते राष्ट्रीय हितापेक्षाही वरचढ ठरते.

'नारी शक्ती वंदन' ही घटनादुरुस्ती काळाची गरज

'नारी शक्ती वंदन' ही घटनादुरुस्ती काळाची गरज आहे. आपली आंतरिक शक्ती अजिंक्य आहे. आपल्या लोकसंख्येच्या निम्म्या भागाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी आपल्याला हा संकल्प पूर्ण करायलाच हवा.संसदेतील महिला आरक्षणासाठी हिंमत आणि निर्धार अढळ आहे, असे सांगतानाच देशातील शंभर टक्के नारीशक्तीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी आपल्‍या संदेशात म्‍हटलं आहे.

विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून

केंद्र सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात परिसीमन (डिलिमिटेशन) संदर्भातील विधेयके आणि महिला आरक्षण अंमलात आणण्याबाबतचे सुधारित प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत असतानाच पंतप्रधानांचा हा संदेश आला आहे. हे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून तर राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरपासून सुरू होईल.परिसीमनानंतर लोकसभेच्या जागा सध्याच्या ५४३ वरून सुमारे ८०० ते ८५० पर्यंत वाढतील आणि त्यासोबतच महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी सरकारची भूमिका आहे. संबंधित विधेयकांच्या मसुद्यांना मंत्रिमंडळाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच संसद आणि विधिमंडळांमध्ये महिलांना एकतृतीयांश जागा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान मोदींनी शनिवारीही केला होता व्‍हिडिओ जारी

शनिवार, २८ नोव्‍हेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, "देशाच्या 'नारी शक्ती'ला एक वचन दिले गेले आहे आणि सरकार ते पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. महिला आरक्षणाला विरोध करणार्‍या राजकीय पक्ष देशातील 'नारी शक्ती'ला संसद आणि विधानसभांमधील त्यांचा सहभाग वाढवण्यापासून कधीही रोखू शकणार नाहीत. सरकारचा निर्धार पक्का आहे आणि त्यांना देशभरातील महिलांचा पाठिंबा आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT