पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन. ( संग्रहित छायाचित्र ) Pudhari Photo
राष्ट्रीय

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निमंत्रणावरून PM मोदी दुसऱ्यांदा रशियाला जाणार

BRICS Summit 2024: 'ब्रिक्स' परिषदेत सहभागी होणार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून 22-23 ऑक्टोबर 2024 रोजी रशियाला भेट देणार आहेत. रशियाच्या अध्यक्षतेखाली कझान येथे होणाऱ्या १६ व्या ब्रिक्स परिषदेत ते सहभागी होणार आहेत. ब्रिक्स परिषदेत पीएम मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह संघटनेच्या इतर राष्ट्रप्रमुखांनाही भेटण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या संदर्भातील माहिती दिल्याचे वृत्त 'ANI' वृत्तसंस्थेने दिले आहे.

BRICS चे सदस्य देश कोणते आहेत?

रशिया यंदा ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर सौदी अरेबिया, इराण, इथियोपिया, इजिप्त, अर्जेंटिना आणि संयुक्त अरब अमिराती हे त्याचे नवीन सदस्य आहेत. अशा परिस्थितीत पीएम मोदी त्या सर्व देशांच्या नेत्यांची भेट घेऊ शकतात. त्यामुळे पीएम मोदींचा हा दोन दिवसांचा दौरा महत्त्वाचा ठरू शकतो.

PM मोदींना रशियाकडून सर्वोच्च नागरी सन्मान

पीएम मोदी याच वर्षी 8 जुलै रोजी दोन दिवसांसाठी रशियाला गेले होते. त्या दरम्यान पीएम मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टलने सन्मानित करण्यात आले होते. ब्रिक्सच्या महत्त्वाविषयी बोलताना, हे प्रमुख जागतिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ प्रदान करेल. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की शिखर परिषद ब्रिक्सने सुरू केलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि भविष्यातील सहकार्यासाठी संभाव्य क्षेत्रे ओळखण्याची मौल्यवान संधी देईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT