नवी दिल्ली : भारताला कोणीही अणुबॉम्बची भिती घालू नये, न्युक्लीअर ब्लॅकमेल आम्ही सहन करणार नाही, अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीला भारत भीक घालत नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आज सायंकाळी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर व युद्धाबाबत देशाची भूमिका स्पष्ट केली. यापुढे भारत कदापीही दहशतवाद सहन करणार नाही असा स्पष्ट संदेश त्यांन जगाला दिला आहे.
दहशतवाद्यांना पोसणारे भारताला ‘न्युक्लीअर ब्लॅकमेल’ करत आहेत हे कदापी सहन केले जाणार नाही. या ब्लॅकमेलच्या आडून चालणाऱ्या दहशतवादावर भारत सटीक व निर्णायक वार करेल असेही मोदी यांनी यावेळी सांगितले. या संदेशातून मोदी यांनी यापूढे भारत दहशतवादाला सहन केले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.
पुढे त्यांनी म्हटले की दहशतवाद पोसणारे सरकार व दहशतवादी म्होरके यांना वेगवेगळे समजणार नाही तर त्यांना एकाच तराजूत तोलेले जाईल. त्यांनी यातून पाकिस्तान सरकारवर थेट निशाणा साधला आहे व यापूढे होणाऱ्या दहशतवादी कारवायांना थेट पाकिस्तानलाच जबाबदार धरले जाईल असे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे. याबरोबर मोदी यांनी आपल्या भाषणात सैन्यदलाचे आभार मानले आहेत. तसेच ऑपरेशन सिंदूर हे केवळ स्थगित कले आहे थांबवलेले नाही असेही त्यांनी सांगितले.