राष्ट्रीय

Narendra Modi : PM माेदी करणार स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्‍ये ध्‍यान, जाणून घ्‍या त्‍याची वैशिष्ट्ये

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूकीच्या अंतिम टप्प्याचा प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीला जाणार आहेत. गेल्या दीड महिन्यापासून लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर सभा, रोड शोच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र माेदींनी देशभरात झंझावती प्रचार केला. आता प्रचार सांगता झाल्‍यानंतर पंतप्रधान मोदी हे ३० मे ते १ जूनदरम्यान ध्यानधारणेसाठी  कन्याकुमारीला जाणार आहेत. येथील स्‍वामी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ते ध्यानधारणा करतील. जाणून घेवूया या वास्‍तूची ठळक  वैशिष्ट्ये….

पंतप्रधान मोदी 30 मे ते 1 जून 2024 या कालावधीत कन्याकुमारीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 30 मे ते 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत ते विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानधारणा करतील. स्वामी विवेकानंदांनी ज्‍या  खडकावर ध्यान केले होते तेथे ते ध्यान करणार आहेत. करतील. स्‍वामी विवेकानंद हे समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 500 मीटर अंतरावर पोहत ते या खडकावर पोहचले होते. 25 ते 27 डिसेंबर 1892 पर्यंत म्हणजे तीन दिवस ते या खडकावर ध्यान करत राहिले. त्यांच्या ध्यानाचा केंद्रबिंदू भारताचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य होता. त्याच ठिकाणी ध्यान करणे हे स्वामीजींचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्याद्वारे देशवासियांच्या उन्नतीसाठी वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते.

स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलची ठळक वैशिष्ट्ये

  • देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.व्ही.व्ही.गिरी यांनी स्‍वामी विवेकानंद रॉक मेमोरियलचे १९७० मध्‍ये उद्घाटन केले
  •  येथे एप्रिलमध्ये येणाऱ्या चैत्र पौर्णिमेला चंद्र आणि सूर्य दोघेही एकाच क्षितिजावर समोरासमोर दिसतात
  • स्मारकाचे प्रवेशद्वार अजिंठा आणि एलोरा गुंहासारखेच
  • हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र एकत्र येण्याचे हे ठिकाण आहे.
  • मेमोरियलचा मंडप कर्नाटकातील बेलूर येथील श्री रामकृष्ण मंदिरासारखा
  • भारताच्या पूर्वेकडील आणि पश्चिम किनारपट्टीला जाेडणारे  हे ठिकाण आहे

स्वामी विवेकानंदांनी पाहिले विकसित भारताचे स्वप्न

. संपूर्ण देशाचा दौरा करून 24 डिसेंबर 1892 रोजी स्वामी विवेकानंद कन्याकुमारी येथे पोहोचले होते. येथेच त्यांना भारतमातेचे दर्शन झाले. येथेच त्यांनी आपले उर्वरित आयुष्य भारतातील गरिबांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला हाेता.

विवेकानंद ज्‍या खडकावर ध्‍यानधारणा केली तेथे विवेकानंद स्मारक उभारण्यासाठी संघर्ष झाला. येथे विवेकानंद स्मारक मंदिर उभारण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख एकनाथ रानडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2 सप्टेंबर 1970 रोजी देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.व्ही.व्ही.गिरी यांनी स्मारकाचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळा दोन महिने चालला. त्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही सहभाग घेतला होता.

२०१९ लाेकसभा निवडणुकीनंतर PM माेदींनी केले हाेते रुद्र गुहेत ध्यान

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी भेट देण्याची ही पहिलीच वेळ नाही. लोकसभा निवडणुकीच्या 2019 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींनी केदारनाथला भेट दिली. केदारनाथ मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रुद्र गुहेत ते ध्यान करण्यासाठी गेले होते. येथे त्यांनी 17 तास ध्यान केले. गुहेत ध्यान करतानाची त्यांची छायाचित्रे खूप प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर ही गुहा धार्मिक पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे. तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडला भेट दिली होती.

SCROLL FOR NEXT