PM Modi  file photo
राष्ट्रीय

PM Modi UNGA 2025: PM मोदी अमेरिकेला जाणार नाहीत.., संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जयशंकर करणार भारताचं नेतृत्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षीच्या शेवटी होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) बैठकीत सहभागी होणार नाहीत.

मोहन कारंडे

PM Modi UNGA 2025

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षीच्या शेवटी होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) बैठकीत सहभागी होणार नाहीत. त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकाला जातील. या बैठकीतील वक्त्यांची सुधारित यादी जाहीर झाल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेचं ८० वे सत्र ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर २३ ते २९ सप्टेंबरपर्यंत उच्चस्तरीय बैठक चालेल. या बैठकीत पहिल्यांदा ब्राझील आणि त्यानंतर अमेरिका महासभेला संबोधित करेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २३ सप्टेंबर रोजी UNGA च्या व्यासपीठावरून जागतिक नेत्यांना संबोधित करतील. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ते पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सत्राला संबोधित करणार आहेत. भारतातर्फे परराष्ट्र मंत्री जयशंकर २७ सप्टेंबर रोजी या सत्राला संबोधित करतील. मात्र, याआधी जुलैमध्ये जाहीर झालेल्या वक्त्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींचं नाव होतं. त्या यादीनुसार, पंतप्रधान मोदी २६ सप्टेंबर रोजी महासभेला संबोधित करणार होते. मात्र, वक्त्यांच्या यादीत पुढेही बदल होऊ शकतो.

चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि इस्रायलचे राष्ट्रप्रमुख २६ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार आहेत. हे सत्र २२ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त एका बैठकीने सुरू होईल. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक १९९५ च्या बीजिंगमधील ऐतिहासिक परिषदेनंतर झालेल्या प्रगतीवर देखील विचार करेल. यासोबतच, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस २४ सप्टेंबर रोजी एक हवामान शिखर परिषद आयोजित करतील, जे जागतिक नेत्यांसाठी त्यांच्या नवीन राष्ट्रीय हवामान कृती योजना सादर करण्याचं एक व्यासपीठ असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT