PM Narendra Modi | चहा पिण्यात वेळ घालवण्यापेक्षा सभागृहात बसून संधीचे सोने करा file photo
राष्ट्रीय

PM Narendra Modi | चहा पिण्यात वेळ घालवण्यापेक्षा सभागृहात बसून संधीचे सोने करा

पंतप्रधानांनी ‘एनडीए’च्या खासदारांना फटकारले

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : कॅन्टीनमध्ये चहा पिण्यात वेळ घालवण्यापेक्षा सभागृहात बसा आणि मिळालेल्या संधीचे सोने करा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांना फटकारले आहे.

संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षात तीव्र खडाजंगी पाहायला मिळाली. एका बाजूला संसदेच्या कामकाजात व्यत्यय येत असतानाच, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना शिस्तीचे धडे देत सभागृहात उपस्थित राहण्याबाबत कडक शब्दांत तंबी दिली आहे.

भाजप संसदीय दलाच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी खासदारांच्या अनुपस्थितीवर कडक नाराजी व्यक्त केली. ‘चहा पिण्यासाठी कॅन्टीनमध्ये वेळ घालवण्यापेक्षा सभागृहाच्या कामकाजात सक्रिय सहभागी व्हा,’ अशा शब्दांत त्यांनी खासदारांना सुनावले.

कोट्यवधी कार्यकर्त्यांमधून तुमची निवड होऊन तुम्हाला सभागृहात बसण्याची संधी मिळते, तिचे सोने करा, असा उपदेश त्यांनी दिला. यावेळी त्यांनी खासदार निशिकांत दुबे यांच्या नावाचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, दुबे यांच्याकडून सभागृहात बसण्याची शिस्त शिका, असे सांगतानाच कॅन्टीनमध्ये वेळ घालवणार्‍या सदस्यांना अप्रत्यक्षपणे इशाराही दिला. हा इशारा मोदी यांनी दुबे यांनाही दिल्याचे मानले जात आहे. एनडीएचे अनेक खासदार संसदेच्या कामकाजात सक्रिय सहभाग देत नसल्याचे निदर्शनाला आल्यानंतर मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT