PM Modi celebration Raksha Bandhan children
नवी दिल्ली : देशभरात शनिवारी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. दिल्लीतील शाळकरी विद्यार्थीनींनी पंतप्रधान निवासस्थानी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली. चिमुकल्या विद्यार्थीनींनी पंतप्रधान मोदींसाठी विशेष राख्या आणल्या होत्या.
या विशेष रक्षाबंधन कार्यक्रमाचा एक व्हिडीओ पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओमध्ये चिमुकल्यांसोबत पंतप्रधान मोदी संवाद साधताना दिसत आहेत. त्यांनी सर्व विद्यार्थिनींना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या.
एक चिमुकली मला पंतप्रधान व्हायचे आहे, असे पंतप्रधान मोदींना सांगताना दिसत आहे. ‘स्वच्छ भारत’, ‘मन की बात’, ‘उज्ज्वला गॅस’, ‘अटल पेन्शन’, ‘डिजीटल इंडिया’, अशा केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख यावेळी दोन विद्यार्थिंनीनी पंतप्रधान मोदींसमोर केला.
या सर्व योजना विद्यार्थीनींनी लक्षात ठेवल्याने पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.