नवी दिल्ली : रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले की, रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे, हा महीना समाजासाठी शांतता आणि सौहार्द घेऊन येवो. हा पवित्र महिना चिंतन, कृतज्ञता आणि धार्मिकतेचे प्रतीक आहे. तसेच आपल्याला करुणा, दया आणि सेवा या मूल्यांची आठवण करून देणारा महिना आहे. रमजान मुबारक, असे पंतप्रधान म्हणाले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही रमजाननिमित्त शुभेच्छा दिल्या. रमजान मुबारक! हा पवित्र महिना तुमचे जीवन आनंदाने भरो आणि तुमच्या हृदयात शांती आणो, असे राहूल गांधी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. सर्वांना रमजानच्या खूप शुभेच्छा. हा पवित्र महिना तुम्हा सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि शांती घेऊन येवो, अशी प्रार्थना करते, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.