पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेत बुधवार, १३ डिसेंबर रोजी दाेन तरुणांनी घुसखोरी केली. या घटनेचे तीव्र पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी आज (दि.१४) केंद्रीय मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. (PM Modi On Parliament Security Breach)
संसदेतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१४) सकाळी वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि अनुराग ठाकूर उपस्थित होते. (PM Modi On Parliament Security Breach)
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवार, १३ डिसेंबर रोजी दाेन तरुणांनी लोकसभेत घुसखोरी केली. हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाज सुरू होताच, संसद सुरक्षेवरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली हाेती. या घटनेचे तीव्र पडसाद आज ( दि. १४ ) लोकसभेत उमटले. सुरक्षा त्रुटीवरुन विराेधी पक्षांच्या सदस्यांनी सरकारविराेधात घाेषणाबाजी केली. यामुळे प्रचंड गदारोळ झाला. अखेर लोकसभा अध्यक्षांनी लाेकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. (PM Modi On Parliament Security Breach)
बुधवार, १३ डिसेंबर राेजी लोकसभा सभागृह सुरक्षा भंगाच्या प्रकार घडला. यावर आज विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झालेले दिसले. त्यांनी सत्ताधारी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची देखील मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावेळी केली.
लोकसभेमध्ये दुपारी एकच्या सुमारास शून्यकाळ सुरू असताना घुसखोरीचा प्रकार घडला. (Parliament Attack) दरम्यान, सुरक्षा व्यवस्थेतील अक्षम्य चुकीची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. लोकसभा सचिवालयाने आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
लोकसभेचं कामकाज सुरू असताना तरुणांनी बुधवारी (दि. 13) घुसखोरी करुन घोषणा देत धुराचे नळकांडे फोडले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यातील(UAPA ) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.