पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युक्रेन दौऱ्यावर आहेत. आज (दि.२३ ऑगस्ट) ते युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले असून, येथील नागरिकांनी जोरदार पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले आहे. १९९१ नंतर भारतीय पंतप्रधानांचा हा दौरा आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युक्रेनचा हा पहिलाच दौरा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यासंदर्भातील माहिती त्यांच्या एक्स अकाऊंटवरून दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "आज (दि.२३) सकाळी लवकर कीवला पोहोचलो. यावेळी युक्रेच्या किव शहरात भारतीय समुदायाने जोरदार स्वागत केले". यासोबत त्यांनी फोटो देखील शेअर केले आहेत.
या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते. पीएम मोदींच्या मते, "युक्रेन आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे." त्यांच्या युक्रेन दौऱ्याच्या दीड महिन्यापूर्वी पंतप्रधान मोदी रशियालाही गेले होते. त्याने पोलंड ते युक्रेन असा ट्रेनने प्रवास केला.