पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांची आज (दि.२५) दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे भेट झाली. ANI X
राष्ट्रीय

पीएम मोदी, इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांची हैदराबाद हाऊसमध्ये भेट

PM Modi on Prabowo Subianto | म्यानमार संघर्षावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांची आज (दि.२५) दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे भेट झाली. दरम्यान, सुबियांतो प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती सुबियांतो हे दोघे भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, म्यानमार संघर्ष हा दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा प्रमुख अजेंडा असेल. (PM Modi on Prabowo Subianto)

या भेटीदरम्यान दोन्ही देशातील राजकीय, संरक्षण आणि सुरक्षा संबंधित सहकार्य मजबूत करण्याचा विचार करतील. इंडोनेशिया भारताकडून खरेदी करण्यास उत्सुक असलेल्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची घोषणाही या बैठकीनंतर होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, सुबियांतो यांच्या भेटीदरम्यान तिसरा सीईओ फोरम आयोजित केला जाणार आहे.

त्यापूर्वी, राष्ट्रपती सुबियांतो यांनी राजघाट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी राजघाटावर पुष्पहार अर्पण केला आणि अभ्यागत पुस्तिकेवर स्वाक्षरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT