पुढारी ऑनलाईन डेस्क : मुस्लिमधर्मीय बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास आज (दि. २) पासून प्रारंभ होत आहे. याच्या पूर्वसंध्येला शनिवारी तराबीहच्या नमाजनंतर रमजान रोजांना सुरुवात झाली. यानंतर मुस्लिम कुटुंबीयांनी आकाशात चाँद दर्शनाचा लाभ घेतला. रमजान महिन्याच्या रोजांची जय्यत तयारी घरोघरी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रमजानचा पवित्र महिना सुरू होत असताना, तो आपल्या समाजात शांती आणि सौहार्द निर्माण करेल. हा पवित्र महिना चिंतन, कृतज्ञता आणि भक्तीचे प्रतीक आहे. तसेच करुणा, दया आणि सेवेच्या मूल्यांची आठवण करून देतो. रमजान मुबारक, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.