PM Modi Akshaya Tritiya wishes
नवी दिल्ली : अक्षय तृतीयानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुभेच्छा देताना म्हणाले की, मानवतेला समर्पित हा पवित्र सण सर्वांना यश, समृद्धी आणि आनंद देऊन जावो, हा आनंद विकसित भारताच्या संकल्पाला नवीन बळ देईल. तर हा शुभ प्रसंग सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी, प्रगती, यश आणि कल्याण घेऊन येवो, अशा शुभेच्छा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्या.