Prime Minister Narendra Modi | काँग्रेसने राष्ट्रीय कार्यक्रमाला राजकारणाचे व्यासपीठ बनवले -
राष्ट्रीय

PM Narendra Modi | काँग्रेसने राष्ट्रीय कार्यक्रमाला राजकारणाचे व्यासपीठ बनवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी; मेरठ मेट्रो रेल्वे विस्तार कामाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

मेरठ; वृत्तसंस्था : जगावर प्रभाव टाकणार्‍या ‘एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये शर्ट काढून निदर्शने करणे हे देशाच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारे होते. विकसनशील देशात अशी परिषद कधी झाली नव्हती. संपूर्ण देशाला अभिमान वाटला. पण काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टीमने काय केले? त्यांनी भारताच्या जागतिक कार्यक्रमाला आपल्या ‘गंदी’ आणि ‘नंगी’ राजकारणाचे व्यासपीठ बनवले, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे चढवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झालेल्या सभेत काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. पंतप्रधानांनी प्रथम विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले, त्यात नमो भारत ट्रेन आणि मेरठ मेट्रो रेल्वे विस्तार यांचा समावेश होता. त्यानंतर भाषणात ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी भारतात जगातील सर्वात मोठी इम्पॅक्ट समिट झाली. 80 हून अधिक देशांचे प्रतिनिधी, सीईओ आणि नेते उपस्थित होते. विकसनशील देशात अशी परिषद यापूर्वी कधीच झाली नव्हती. काँग्रेस नेते परदेशी पाहुण्यांसमोर नग्न होऊन आले. मी काँग्रेसला विचारतो, देशाला आधीच तुमची खरी ओळख माहिती आहे, मग आणखी कपडे काढण्याची गरज काय? तुम्ही आधीच नग्न आहात, मग आणखी का?

पंतप्रधानांनी राहुल गांधींवर नाव न घेता टीका करत त्यांची संभावना सरफिरा आणि बेलगाम अशा शब्दांत केली. ते म्हणाले, देशाच्या सर्वात जुन्या पक्षाची विचारधारा किती दिवाळखोर आणि गरीब झाली आहे, हे या कृतीतून दिसते. काँग्रेस स्वतःच्या देशाची बदनामी करण्यात धन्यता मानते. त्यांनी काँग्रेस नेत्यांवर वैयक्तिक हल्ले करत आपल्या आईचा अपमान केल्याचा आरोपही केला. तसेच काँग्रेसच्या या कृतीला इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनीही काँग्रेसच्या या कृतीचा निषेध व्यक्त केल्याबद्दल आभार मानले. इतर विरोधी पक्षांनी सत्य आणि राष्ट्रीय अभिमानासाठी उभे राहिले, फक्त काँग्रेसने देशाची बदनामी केली, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT