Shiv Sena Shinde Group MPs met Prime Minister Narendra Modi
शिवसेना शिंदे गटाच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी भेट घेतली. file photo
राष्ट्रीय

शिवसेनेसोबतची युती ही काळाच्या कसोटीवर उतरलेली मैत्री : PM मोदी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेसोबत आमची राजकीय युती नाही, ही युती म्हणजे काळाच्या कसोटीवर उतरलेली मैत्री आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून शिवसेना खासदारांसोबत छान भेट झाल्याचे म्हटले आहे.

मोदींकडून मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक

पंतप्रधान मोदी यांनी शिंदे गटाच्या खासदारांसोबतचा फोटो त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट केला आहे. शिवसेना खासदारांसोबत छान भेट झाली. आमची राजकीय युती नाही; ही काळाची कसोटी असलेली मैत्री आहे, जी समान आदर्शांनी बांधलेली आहे आणि भारताच्या विकासासाठी सामायिक दृष्टीकोन आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. यावेळी मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांना पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत, असे मोदी म्हणाले.

खासदारांची पंतप्रधानांकडे मोठी मागणी

या भेटीदरम्यान शिंदे गटाच्या खासदारांनी पंतप्रधानांकडे केंद्राच्या आगामी अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरघोस निधी देण्याची मागणी केली होती. राज्यात नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देखील मोदी यांना दिली. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार धैर्यशील माने, खासदार संदिपान भुमरे, खासदार रविंद्र वायकर, खासदार नरेश म्हस्के, खासदार मिलिंद देवरा यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT