PM Kisan Yojana 20th installment date |
दिल्ली : केद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला ६ हजार रूपये लाभार्थी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना १९ हप्ते मिळाले आहेत. खरीप हंगामाची पेरणी सुरू असल्याने बी-बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांना २० व्या हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. जाणून घ्या कधी मिळणार २० व्या हप्त्याचे २ हजार रूपये?
शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये बँक खात्यात पाठवले जातात. आता २० वा हप्ता जारी होणार आहे, ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण १९ हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. २४ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांना १९ वा हप्ता देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हप्त्याचे पैसे डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले होते.
यानंतर आता २० वा हप्ता या महिन्यात म्हणजेच जूनच्या अखेरपर्यंत जमा केला जाऊ शकतो. सरकारने मात्र हप्ता अधिकृतपणे कधी जारी केला जाईल, याची माहिती अद्याप दिलेली नाही. अनेकदा तांत्रिक किंवा कागदपत्रांच्या कारणांमुळे शेतकऱ्यांचे हप्ते अडकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जाऊन 'लाभार्थी स्थिती' आणि 'पेमेंट स्थिती' तपासावी. यामुळे तुम्हाला तुमचे मागील हप्ते मिळाले आहेत की नाही आणि पुढील हप्त्यात काही समस्या असेल तर कळेल.
पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत जारी केलेले सर्व हप्ते चार महिन्यांच्या अंतराने जारी करण्यात आले आहेत. १७ वा हप्ता जून २०२४ मध्ये जारी करण्यात आला होता. चार महिन्यांच्या अंतरानंतर, १८ वा हप्ता ऑक्टोबर २०२४ मध्ये जारी करण्यात आला. यानंतर, पुन्हा चार महिन्यांच्या अंतराने, फेब्रुवारी २०२५ मध्ये १९ वा हप्ता देण्यात आला. यानुसार,२० वा हप्ता पुढील चार महिन्यांच्या अंतराने म्हणजेच जूनमध्येच जारी केला जाऊ शकतो. येत्या काही दिवसांत, सरकारकडून हप्त्याची घोषणा केली जाऊ शकते.