Bilaspur Airport | लँडिंगवेळी विमानाचे टायर फुटले; ३७ प्रवासी सुखरूप 
राष्ट्रीय

Bilaspur Airport | लँडिंगवेळी विमानाचे टायर फुटले; ३७ प्रवासी सुखरूप

छत्तीसगडच्या बिलासपूर विमानतळावरील प्रकार

पुढारी वृत्तसेवा

बिलासपूर; वृत्तसंस्था : दिल्लीहून छत्तीसगडमधील बिलासपूरकडे येणाऱ्या अलायन्स एअरच्या विमानाचे लँडिंगदरम्यान टायर फुटल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. विमान बिलासपूर विमानतळावर उतरत असताना डाव्या बाजूच्या टायरमध्ये अचानक बिघाड झाला. या विमानात ३७ प्रवासी आणि चार कर्मचारी, असे एकूण ४१ जण होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त नाही.

अलायन्स एअरचे विमान सकाळी सुमारे ११ वाजता बिलासपूर विमानतळावर उतरत होते. त्यावेळी विमानाच्या डाव्या बाजूच्या टायरमध्ये समस्या निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील कर्मचारी आणि संबंधित यंत्रणा सक्रिय झाली. विमानातील सर्व ३७ प्रवासी आणि चार क्रू सदस्यांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले. त्यांना धावपट्टीवरून टर्मिनल इमारतीत नेण्यात आले.

टायर फुटल्यामुळे विमानाच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी म्हणून विमानाला पुढील उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली नाही. विमानतळ आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून विमानाची पाहणी आणि तांत्रिक तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. घटनेनंतर संबंधित विमान विमानतळावरच ठेवण्यात आले. तांत्रिक तपासणी पूर्ण होईपर्यंत त्याचे उड्डाण रोखले. त्यामुळे बिलासपूरहून पुढे जाणारे नियोजित उड्डाण रद्द करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT