पुढारी ऑनलाईन डेस्क: मध्य प्रदेशातील गुना येथील हवाई पट्टीवर खासगी एव्हिएशन अकादमीचे दोन आसनी विमान आज (दि.११ ऑगस्ट) दुपारी कोसळले. यामध्ये असणारे विमान चालक जखमी झाले आहेत, या संदर्भातील माहिती पोलिसांनी दिल्याचे वृत्त 'PTI'ने दिले आहे.
इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विमान अपघातात कॅप्टन व्ही.चंद्र ठाकूर आणि पायलट नागेश कुमार जखमी झाले. अपघातग्रस्त विमान कर्नाटकच्या बेळगाव एव्हिएशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे आहे. दोन्ही पायलट हैदराबादचे आहेत. विमान दुर्घटनेनंतर कॅन्ट पोलिसांसह अकादमीचे अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. हे विमान चाचणी आणि देखभालीसाठी आणण्यात आले होते,असे वृत्तात म्हटले आहे.