pitbull attack in patiala पंजाबच्या पतियाळा जिल्ह्यातून एक भीतीदायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, एका घराची पाहणी करण्यासाठी घराबाहेर उभ्या असलेल्या पती-पत्नीवर एक पिटबुल कुत्रा अचानक हल्ला करत असल्याचे दिसत आहे. हे डॉक्टर असलेले पती पत्नी एक घर पाहण्यासाठी प्रॉपर्टी डीलरसोबत आलेले असता हा हल्ला झाला. या घराचे गेट उघडताच एक पिटबूल सुसाट बाहेर पळत येतो व हल्ला करतो.
सुरवातीला पत्नीवर हा कुत्रा हल्ला करतो पतीच्या मागे पत्नी लपण्याचा प्रयत्न करते पण पिटबूल पतीच्याही पाठीचा चावा घे त असल्याचे दिसते. पिटबुलला पळवून लावण्यासाठी, तिथे उपस्थित असलेले लोक त्याच्यावर अनेक वेळा हातात गावेल त्या वस्तूने मारहाण करतात, पण तरीही तो त्यांना सोडत नाही. तो सुमारे एक मिनिट आणि पंधरा सेकंद त्या दोघांवर हल्ला करत राहतो. या काळात, तो त्या जोडप्याला २६ वेळा चावला आहे. या घटनेचा व्हिडिओ खूपच भीतीदायक असल्याचे दिसून येत आहे.
घर पाहण्यासाठी आले होते डॉक्टर जोडपे
मिळालेल्या माहितीनुसार, पतियाळा येथील घुमान नगर भागात पती-पत्नी भाड्याने राहण्यासाठी घर पाहण्यासाठी आले होते. डॉक्टर असलेले अंकित सभरवाल व त्यांची पत्नीवर हा हल्ला झाला आहे. यावेळी प्रॉपर्टी डीलर त्यांना घर दाखवत असतो. तो गेटकडे जातो व गेट उघडतो. आतून अचानक एक कुत्रा धावत येतो. व महिलेवर हल्ला करतो त्यात ती खाली कोसळते तीचा पती कुत्र्याला हाणण्याचा प्रयत्न करतो. पत्नीला वाचवण्यासाठी पती कुत्र्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करतो पण तो त्याच्यावरही हल्ला करतो. व चावा घेत सुटतो.
शस्त्रक्रिया करण्याची वेळ
या दांपत्याला कुत्र्याने एवढे जोरात चावे घेतले आहेत की दोघांचा हाता पायांना टाके पडले आहेत. तर अंकित संभरवाल यांच्या पत्नीच्या हातावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. या दोघांवर आता उपचार सुरु आहे. अकिंत यांनी सांगितले की मी माझ्या पत्नीसोबत घर पाहण्यासाठी जात होतो. मला घर भाड्याने पाहण्यासाठी बोलावण्यात आले. तिथे पोहोचून गेटची कुंडी उघडताच कुत्र्याने आमच्यावर हल्ला केला. मी आणि माझी पत्नी जखमी झालो. माझ्या संपूर्ण शरीरावर टाके पडले आहेत. शस्त्रक्रियेनंतर माझ्या पत्नीला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
लोकांनी काठ्यांनी पिटबुलवर केला हल्ला पण दाम्पत्याला सोडले नाही
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, घर खरेदी करण्याच्या उद्देशाने हे दाम्पत्य प्रॉपर्टी डीलरसोबत घुमान नगर येथील घर पाहण्यासाठी गेले होते. प्रॉपर्टी डीलरने घराचे गेट उघडताच आत उपस्थित असलेल्या पिटबूलने अचानक बाहेर येऊन दाम्पत्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. आजूबाजूच्या घरातून काही लोक बाहेर आले आणि त्यांनी कुत्र्याला हटवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी काठ्यांनी पिटबुलवर हल्ला केला आणि खूप प्रयत्नांनंतर कुत्र्याला जोडप्यापासून वेगळे केले. यानंतर दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले