Sirsa Photographer Accident Video pudhari
राष्ट्रीय

Sirsa Photographer Accident Video: लग्नात 'पाठवणी'चे क्षण टिपण्यासाठी कॅमेरामन रस्त्यावर गेला... तिथंच काळानं घाला घातला

Anirudha Sankpal

Sirsa Photographer Accident News: सिरसा येथील २७ वर्षाचा फोटोग्राफरचे बुधवारी निधन झाले. लग्नाचे शूटिंग करत असताना त्याला एका भरधाव वेगानं येणाऱ्या कारने उडवले. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी सांगितलं की धडक इतकी जोरदार होती की कॅमेरामन तब्बल ३० मीटर लांब उडून पडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात हिसार रोडजवळ सिरसा बस स्थानकाजवळ झाला.

कॅमेरामनला संधीच मिळाली नाही

पोलिसांनी सांगितलं की या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजवरून हा फोटोग्राफर हा लग्नाच्या ठिकाणाच्या बाहेर असलेल्या रस्त्याच्या मध्यभागी उभा होता. तो पाठवणीचे क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपत होता.

सिरसा सिव्हिल लाईन एसएचओ बलराज यांनी सांगितलं की, 'मलकीत हा पाठवणीच्या विधीचा व्हिडिओ शूट करण्यात बिझी होता. दरम्यान, रिट्झ कार वेगानं येत होती. त्या कारनं मलकीतला क्षणार्धात उडवलं. मलकीतला उभे असलेल्या पाहुण्यांनी बाजूला जाण्यास सांगितलं होतं. मात्र गाडी इतक्या वेगात होती की मलकीतला संधीच मिळाली नाही.'

चालकाला मिळाला जामीन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा फोटोग्राफर सिरसा गावचा होता. या अपघातात तो ३० मिटर लांब उडून पडला. अपघातानंतर त्याला त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र दुखापत गंभीर असल्यामुळं त्याचा मृत्यू झाला.'

ज्या गाडीनं कॅमेरामन मलकीतला उडवलं त्याचा ड्रायव्हर हा फतेहबादचा रहिवासी असून त्याचे नाव संदीप असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला या अपघात प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र नंतर त्याला जामीन मिळाला. सध्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT