नवी दिल्लीः 'हिंदुत्व' शब्दाच्या जागी 'भारतीय संविधानत्व' या शब्दाचा वापर झाला पाहिजे, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली.
ही याचिका फेटाळून लावत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, आम्ही या याचिकेवर सुनावणी करणार नाही. अशी याचिका म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग आहे. घटनेत कुठेही 'हिंदुत्व' हा शब्द वापरण्यात आलेला नसला तरी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयांमध्ये 'हिंदुत्व' या शब्दाचे स्पष्टीकरण नक्कीच दिले आहे. डॉ. एस. एन. कुंद्रा यांनी ही याचिका दाखल केली होती.