दक्षिणात्य अभिनेते व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण. File Photo
राष्ट्रीय

'सनातन'च्‍या रक्षणासाठी 'नरसिंह वाराही विंग' : पवन कल्याण यांची घोषणा

सनातनविरोधी पोस्ट खपवून घेणार नसल्‍याचा इशारा, भाजपने दिले समर्थन

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "सनातन हा केवळ देशासाठीच नव्हे तर जगासाठी मार्गदर्शक प्रकाश आहे.हिंदू मंदिरांना भेटी देताना आणि सनातन धर्माचे पालन करताना काही मूल्ये जपली पाहिजेत. सनातन धर्माशिवाय देश तसाच राहणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे," असे स्‍पष्‍ट करत दक्षिणात्य अभिनेते व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी 'नरसिंह वाराही विंग' स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आपला पक्ष जनसेना 'आंध्र प्रदेश आणि तेलंगणात सनातन धर्माच्या रक्षणासाठी' नरसिंह वाराही विंग स्थापन करेल, असेही त्‍यांनी जाहीर केले आहे. दरम्‍यान, पवन कल्‍याण यांच्‍या भूमिकेचे भाजपने समर्थन केले आहे.

'सनातन'विरोधी पोस्ट खपवून घेणार नाही

पवन कल्याण यांनी म्‍हटलं आहे की, हिंदू मंदिरांना भेटी देताना आणि सनातन धर्माचे पालन करताना काही मूल्ये जपली पाहिजेत. सनातन धर्माशिवाय देश तसाच राहणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. सनातन हा केवळ देशासाठीच नव्हे तर जगासाठी मार्गदर्शक प्रकाश आहे. 'सोशल मीडियावर हिंदू धर्म किंवा सनातन धर्माची खिल्ली उडवणारी कोणतीही पोस्ट खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत सनातन धर्माची बदनामी रोखण्‍याच्‍या दिशेने एक पाऊल म्हणून जनसेना पक्षाने सनातन धर्म संरक्षणासाठी नरसिंह वाराही विंगची स्थापना केली आहे, अशी घोषणाही त्‍यांनी केली.

चर्च आणि मशिदीचाही आदर केला पाहिजे...

पवन कल्याण म्हणाले, 'चर्च आणि मशिदीचाही आदर केला पाहिजे. तसेच सनातन धर्माविरुद्ध काहीही करून लोकांच्या भावना दुखावल्या तर त्याला शिक्षा होईल. मी भाजप प्रणित एनडीए सरकारच्या वतीने नाही तर जनसेनेच्या वतीने बोलत आहे. अनेकांनी आम्हाला युथ विंग, कल्चरल विंग इ. या सर्वांपूर्वी, लक्ष्मी नरसिंह स्वामींच्या आशीर्वादाने, सनातन धर्माच्या रक्षणासाठी आम्ही नरसिंह वाराही गणमची घोषणा करत आहोत, जो सनातन धर्माच्या रक्षणासाठी जनसेना आहे. दोन्ही तेलुगू राज्यांमध्ये सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्ही ते तयार करू. मी सर्व धर्मांचा आदर करतो; पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सनातन धर्माचे रक्षण करायचे आहे आणि त्यासाठी मी काम करणार आहे, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

भाजपकडून समर्थन

पवन कल्याण यांच्या घोषणेवर भाजप नेते नलिन कोहली यांनी म्‍हटलं आहे की, काही लोकांनी मर्यादा ओलांडल्या आहेत. सनातन धर्माविषयी मूर्खपणाच्या गोष्टी बोलल्या आहेत. तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री सनातन धर्माबद्दल काय म्हणाले. त्यांनी सनातन धर्माची तुलना एका रोगाशी केली. हे कुठल्या धर्माबद्दल म्हणायला हवं का? फक्त सनातनलाच का टार्गेट? कोणाला सनातन धर्म बळकट करायचा असेल तर त्यात गैर काय?, असा सवालही नलिन कोहलींनी केला आहे.

pawan kalyan forms narsingh varahi brigade to protect sanatan

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT