इंजिनदादा पुढे, डबे राहिले मागे ! File photo
राष्ट्रीय

Patna News | इंजिनदादा पुढे, डबे राहिले मागे !

पुढारी वृत्तसेवा

बक्सर : कपलिंग तुटल्याने मगध एक्स्प्रेसचे इंजिन ९ डबे मागे सोडून १३ डब्यांसह पुढे निघाले. लोको पायलटने प्रसंगावधान राखून इमर्जन्सी ब्रेक लावला आणि रेल्वे थांबवली म्हणून अनर्थ टळला.

पाटणाकडे जात असताना रघुनाथपूर ते तुडीगंजदरम्यान रविवारी ही दुर्घटना घडली. प्रवाशांमध्ये उडालेला गोंधळ वगळता सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नाही. रेल्वेचा इंजिनसह पुढील भाग रघुनाथपूर स्टेशनवर आणण्यात आला आहे. मागील भाग रुळावरच आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT