राष्ट्रीय

Parliament Session 2023 :सलग आठव्या दिवशी संसदेत काहीही कामकाज नाही

Sonali Jadhav
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विरोधकांबरोबर सत्ताधारी सदस्यांनी देखील विविध मुद्द्यांवरुन घातलेल्या प्रचंड गदारोळामुळे संसदेच्या उभय सदनात गुरुवारी कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. सलग आठव्या दिवशी संसदेतली कोंडी फुटू शकलेली नाही. (
Parliament Session 2023)
अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय (Parliament Session 2023) समिती स्थापन करावी, या मागणीवरून काँग्रेससह इतर विरोधी पक्ष आक्रमक आहेत तर विदेशात केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी. यासाठी सत्ताधारी भाजपचे खासदार आग्रही आहेत. लोकसभेत सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर  उभय पक्षाकडून गदारोळाला सुरुवात झाली. गदारोळात काहीच ऐकावयास येत नसल्याने अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आधी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत व त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत तहकूब केले. दुसरीकडे राज्यसभेत दोनवेळच्या तहकुबीनंतर सभापती जगदीप धनकड यांनी कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामकाज 6 एप्रिलपर्यंत चालणार असून सत्ताधारी व विरोधकांचा पवित्रा पाहता संपूर्ण अधिवेशन वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
SCROLL FOR NEXT