मनू भाकरचा सत्कार करताना केंद्रीय मंत्री गडकरी Pudhari Photo
राष्ट्रीय

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिंपिक कांस्य पदक विजेती नेमबाज मनू भाकर नितीन गडकरींच्या भेटीला

केंद्रीय मंत्री नितिन गडकरींकडून मनूचे विशेष कौतूक

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

पॅरिस ऑलिंपिकमधील कांस्य पदक विजेती नेमबाज मनू भाकरने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. इतिहासात आपले नाव कोरणारी देशाची असामान्य नेमबाज मनू भाकरला भेटून आनंद झाल्याचे नितीन गडकरी म्हणाले. तर नितीन गडकरींच्या शब्दांनी मला खेळात आणि त्यापलीकडे जीवनात आणखी मोठ्या ध्येयांसाठी झटण्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया मनू भाकरने दिली.

पॅरिस ऑलिंपिकमध्ये नेमबाज मनू भाकरने कांस्यपदक पटकावले. बुधवारी (दि.7) मनू भाकरचे मायदेशात आगमन झाले. त्यानंतर मनू भाकरने काँग्रेस नेत्या सोनिया गांधींसह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. गुरुवारी (दि.8) मनू भाकरने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनसुख मांडविया, राजनाथ सिंह यांच्याही भेटी घेतल्या. सर्वच नेते आणि मंत्र्यांनी मनू भाकरचे अभिनंदन केले. यावेळी मनू भाकरचे पालक आणि प्रशिक्षक जसपाल राणा उपस्थित होते.

मनू भाकरच्या भेटीनंतर नितीन गडकरी एक्सवर म्हणाले की, इतिहासात आपले नाव कोरणारी देशाची असामान्य नेमबाज मनू भाकरला भेटून आनंद झाला. तिच्या उत्कृष्ट कामगिरीने देशाचा उर अभिमानाने भरून आला. तिच्या सातत्यपूर्ण यशासाठी आणि भविष्यातील आणखी अनेक उल्लेखनीय कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. तर नितीन गडकरींसोबतच्या भेटीनंतर मनू भारकनेही आपल्या भावना व्यक्त केल्या. “देशाचे रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी आमचे स्वागत केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्याच्या शब्दांनी मला खेळात आणि त्यापलीकडे जीवनात आणखी मोठ्या ध्येयांसाठी झटण्याची प्रेरणा दिली आहे. आमच्या भेटीदरम्यान त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी कृतज्ञ आहे.” अशी प्रतिक्रिया मनू भाकरने दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT