पंकजा मुंडे यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. 
राष्ट्रीय

पंकजा मुंडेंनी घेतली अमित शाह यांची भेट

Pankaja Munde : मंत्री झाल्यानंतर मुंडे यांचा पहिलाच दिल्ली दौरा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी सोमवारी (दि.६) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली.

राज्य मंत्रिमंडळात मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दिल्ली दौऱ्यात त्यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. अमित शाह यांना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रसंत भगवान बाबांची मूर्ती भेट दिली.

बजरंग सोनवणे घेणार अमित शाह यांची भेट

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास गतीने करण्यात यावा, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. याच प्रकरणी खा. सोनवणे पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी दिल्ली दौरा करत अमित शाह यांची भेट घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT