India Pakistan Tensions Latest News  file photo
राष्ट्रीय

India Pakistan Tensions Latest News | पाकिस्तानने २० दिवसांनी बीएसएफ जवानाला भारताच्या केले स्वाधीन

BSF jawan returned by Pakistan | पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात असलेल्या बीएसएफ जवानाला भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

मोहन कारंडे

India Pakistan tensions Latest News

दिल्ली : २३ एप्रिलपासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात असलेले बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांना बुधवारी सकाळी भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. अमृतसरमधील अटारी येथील संयुक्त चेकपोस्टवर हे हस्तांतरण झाले, अशी माहिती बीएसएफने दिली. सुरक्षा अधिकाऱ्यांकडून शॉ याची सविस्तर माहिती घेतली जात आहे.

एका अधिकृत निवेदनात बीएसएफने म्हटले आहे की, "आज सकाळी १०:३० वाजता, कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांना बीएसएफने अटारी-वाघा सीमेवर पाकिस्तानकडून परत घेतले. कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ २३ एप्रिलला रात्री फिरोजपूर सेक्टरच्या परिसरात ऑपरेशनल ड्युटीवर असताना चुकून पाकिस्तानी हद्दीत गेल्याने त्याला पाक रेंजर्सनी ताब्यात घेतले होते." ही प्रक्रिया शांततेत आणि नियमानुसार पार पडली, असे बीएसएफने म्हटले आहे.

विश्रांतीसाठी सावली गेला अन्...

शॉ हे १८२ व्या बटालियनचे बीएसएफ जवान आहेत. २३ एप्रिल रोजी पंजाबमधील फिरोजपूरजवळील आंतरराष्ट्रीय सीमा त्याने चुकून ओलांडली. सीमेवरील कुंपणाजवळ कर्तव्यावर होता, त्याच्याकडे सर्व्हिस रायफल होती. विश्रांतीसाठी सावली असलेल्या ठिकाणाकडे गेले असता नकळत तो पाकिस्तानी हद्दीत घुसला, तिथे त्याला पाकिस्तानी रेंजर्सनी अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT