PIB fact check PIB fact check twitter
राष्ट्रीय

PIB fact check: सावधान! तुमच्या मोबाईलवर आलेला 'हा' व्हिडीओ खरा की खोटा? पाकिस्तानातून पसरवली जातेय खोटी माहिती

पीआयबीच्या फॅक्ट चेक यंत्रणेने गेल्या एका महिन्यात सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर अनेक खोट्या आणि बदललेले ५० पेक्षा जास्त व्हिडीओ आढळल्याचे जाहीर केले आहे.

मोहन कारंडे

PIB fact check

नवी दिल्ली: पीआयबीच्या फॅक्ट चेक यंत्रणेने गेल्या एका महिन्यात सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर अनेक खोट्या आणि बदललेल्या व्हिडीओंचे (डीपफेक) ५० पेक्षा जास्त प्रकरणे आढळल्याचे जाहीर केले आहे. त्यापैकी बहुतेक पोस्ट “पाकिस्तानी प्रचार” खात्यांकडून केले असल्याचे समोर आले आहे.

या बदललेल्या व्हिडीओंमध्ये उच्चस्तरीय सरकारच्या अधिकाऱ्यांचे खोटे विधान दाखवले जात होते. यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि सेनाध्यक्ष उपेंद्र द्विवेदी यांचा समावेश आहे. फॅक्ट-चेक यंत्रणेनुसार, पंतप्रधान मोदी यांचा एक बनावट व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात सरकार आधार कार्ड असलेल्या महिलांना मोफत स्कूटर देण्याचे जाहीर करत आहे.

सध्याच्या युरोप-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या प्रचार खात्यांनी एका इराणी जहाजाशी संबंधित भारतीय सैन्य अधिकाऱ्यांशी जोडलेली खोटी माहिती ऑनलाइन पसरविली. टर्कीच्या एका वृत्तपत्राने चुकीने असा दावा केला की, भारताने इराणी जहाजाची माहिती इस्राएलशी शेअर केली आहे, मात्र हा दावा खोटा असल्याचे सत्य तपासणीत स्पष्ट झाले.

पाकिस्तानी प्रचार खात्यांवर असेही आरोप आहेत की, ते एआय तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय हवाई दलाचे खोटे व्हिडीओ तयार करतात आणि त्यात भारतीय सैन्य अधिकाऱ्यांचे खोटे विधान दाखवतात. पाकिस्तानी प्रचार खात्यांनी एका रीलमध्ये भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणि पुरवठा प्रभावित होण्याचा खोटा दावा केला होता. पीआयबीने अशा व्हिडीओ पासून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि अशा प्रकारच्या खोट्या माहितीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT