राष्ट्रीय

Pahalgam terrorist attack | 26 निष्पाप नागरिकांची हत्या करणारे हेच 'ते' तीन दहशतवादी; रेखाचित्रे जारी

दहशतवाद्यांची ओळख पटली

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मीर खोर्‍यातील पहलगाम येथील बैसरन येथे (Pahalgam terrorist attack) मंगळवारी (दि.२२) लष्करी गणवेशात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये दोन परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्यामागील तीन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू ताल्हा अशी या तिन्ही दहशतवाद्यांची नावे पुढे आली आहेत.

पहलगामधील हल्लेखोर दहशतवादी हे बंदी घातलेला दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटचे सदस्य आहेत. पहलगाममधील हल्ला हा अलिकडच्या काळातील काश्मीरमधील सर्वात घातक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक आहे.

पहलगाममध्ये सभोवतालच्या घनदाट पाइन जंगलातून किमान ५ ते ६ दहशतवादी बैसरन येथे आले आणि त्यांनी AK-४७ ने पर्यटकांवर गोळीबार केला. या गटात हल्ल्याच्या काही दिवस आधी खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश होता, अशी माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली आहे. या हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ ​​खालिद असल्याचे गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे.

Pahalgam terrorist attack | दहशतवाद्यांकडून लष्करी दर्जाच्या शस्त्रांचा वापर

प्राथमिक फॉरेन्सिक विश्लेषण आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी लष्करी दर्जाची शस्त्रे आणि अत्याधुनिक संवाद उपकरणांचा वापर केला. यातून त्यांना परकीय शक्तींनी मदत पुरविल्याचे संकेत मिळतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT