File Photo
राष्ट्रीय

Pahalgam Terror Attack | भारताने बंद केले पाकिस्‍तानी विमानांसाठी हवाई क्षेत्र

पाकिस्‍तानला भारताचा आणखी एक झटका | सर्व प्रकारच्या विमानांना भारताच्या हवाई हद्दीतून उडण्यास बंदी

Namdev Gharal

Pahalgam Terror Attack

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पहलगाम येथे झालेल्‍या पाकपुरस्‍कृत दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारताने पाकिस्‍तानच्या नाड्या चांगल्‍याच आवळल्‍याा आहेत. युद्ध सदृश्य परिस्‍थिती निर्माण झाली असून भारत सर्व बाजूंनी युद्धासाठी तयार आहे. याबरोबरच सिंधु करार सारख्या गोष्‍टींनी पाकिस्‍तानची कोंडी केली आहेच. आता भारताने पाकिस्‍तानी विमानांना भारताची हवाई हद्द बंद करुन टाकली आहे. पाकिस्‍तानने भारताच्या विमानांना हवाई क्षेत्रात प्रवेश बंदी केली होती. त्‍याला आता भारताने प्रत्‍यूत्तर दिले आहे.

भारताकडून ३० एप्रील ते २३ मे दरम्‍यान ही बंदी घातली आहे. पाकिस्‍तानमधुन सिंगापूर, मलेशिया, ऑस्‍ट्रेलिया या देशांकडे जाणारी विमाने भारताच्या हवाई क्षेत्रातून जात होती आता त्‍यांना फिरुन चिनमधून किंवा अरबी समुद्रावरुन जावे लागणार आहे.

विमान कंपन्यांना बसणार आर्थिक भूर्दंड

भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्‍तानी विमानाना चांगलेच आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. कारण भारताच्या पूर्वेला असणऱ्या देशांकडे जाण्यासाठी पाकिस्‍तानी विमानांना मोठा वळसा घालावा लागतो. यामुळे इंधनाच्या खर्चात मोठी वाढ होण्याची शक्‍यता आहे. तसेच सुरक्षेचा प्रश्नही महत्‍वाचा आहे.

भारताचा निर्णय घेण्यापूर्वी पाकिस्‍तानी माध्यमांनी पाकिस्‍तानची नॅशनल एअरलाईन ने गिलगीत, स्‍कार्दू आदी विमाने बंद केली आहेत अशा आशयाच्या बातम्‍या छापल्‍या होत्‍या. एस्‍प्रेस ट्रिब्‍यूनच्या मते सर्व कर्मशिअल उड्डाणे सुरक्षेच्या कारणास्‍तव रद्द केली आहेत. भारताबरोरच्या तणावपूर्ण संबधामुळे त्‍यांनी हा निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT