अटारी सीमा  file photo
राष्ट्रीय

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर २८७ भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात परतले

Indians return from Pakistan: १९१ पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परतले

पुढारी वृत्तसेवा

Indians return after terror attack

नवी दिल्ली : पहलागाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील भारतीय नागरिक भारतात परतत आहेत तर भारतातील पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात जात आहेत. अटारी सीमेवरील चेकपोस्टवरून भूमार्गाने २८७ भारतीय नागरिक भारतात परतले तर १९१ पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परतले आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांमध्ये भारत देश सोडावा अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पाकिस्तानी नागरिक भारतातून परत जात आहेत.

अटारी सीमेवरून १९१ पाकिस्तानी नागरिकांनी आपल्या देशाची वाट धरली. तर आपल्या नातेवाईकांच्या आणि प्रियजनांच्या भेटीसाठी गेलेले २८७ भारतीय नागरिकही पाकिस्तानातून भारतात परतले आहेत.

भारतात परतलेले भारतीय नागरिक आणि पाकिस्तानात परतलेले पाकिस्तानी नागरिक यांच्याकडे पर्यटक व्हिसा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT