(Image source- X)
राष्ट्रीय

कोलकातामधील 'आरजी कार'च्या ४५ हून अधिक वरिष्‍ठ डॉक्‍टरांनी दिला राजीनामा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोलकातामधील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्‍पिटलमधील ४५ हून अधिक वरिष्‍ठ डॉक्‍टरांनी आज (दि. ८) राजीनामा दिला. प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्‍टरांच्‍या मागण्‍या अपूर्ण राहिल्‍याने तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येशी संबंधित तपासात प्रगती होत नसल्‍याचा दावा करत त्‍यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला आहे.

सरकारचे  उपोषणावर असलेल्या डॉक्टरांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष

वरिष्‍ठ डॉक्‍टरांनी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्‍पिटल प्रशासनानाला लिहिलेल्‍या पत्रात म्‍हटलं आहे की, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे न्‍यायासाठी बेमुदत उपोषण सुरु आहे. सध्या उपोषणाला बसलेल्या आंदोलक डॉक्टरांची प्रकृती खालावली आहे. आम्ही वरिष्ठ डॉक्टर सामूहिक राजीनामे देत आहोत कारण सरकार उपोषणावर असलेल्या डॉक्टरांच्या बिघडलेल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत आहे आणि जर परिस्थितीची मागणी झाली तर आम्ही वैयक्तिक राजीनामे देखील देऊ,"

वरिष्‍ठ डॉक्टरांनीचे लाक्षणिक उपोषण

दरम्यान, डॉक्टरांच्या आणखी एका संघटनेने, जॉइंट प्लॅटफॉर्म ऑफ डॉक्टर्स (जेपीडी) ने देखील त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांच्या समर्थनार्थ एक निवेदन जारी केले आहे. आरजी कार बलात्कार-हत्या पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी दुर्गापूजा उत्सवादरम्यान मंगळवारी सलग चौथ्या दिवशी प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरांनी बेमुदत उपोषण सुरू ठेवले आहे. सुमारे 15 वरिष्ठ डॉक्टरांनीही लाक्षणिक उपोषण आपले समर्थन जारी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT