Eknath Shinde Pudhari
राष्ट्रीय

Opration Tiger | ऑपरेशन टायगरनंतर शिंदेसेनेला केंद्रात अधिकचे मंत्रिपद मिळणार ! 

१ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्री असे एकूण २ मंत्री पदे मिळण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : ठाकरेंच्या शिवसेनेचे २ तृतीयांश म्हणजेच ६ खासदार गळाला लावण्याचे ऑपरेशन एकनाथ शिंदे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. पुढच्या काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल प्रस्तावित आहेत. यामध्ये वाढलेल्या खासदार संख्येनुसार शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्री असे एकूण २ मंत्री पदे मिळण्याची शक्यता आहे. मात्र शिंदेसेनेला १ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रीपदाची अपेक्षा असल्याचे समजते.   

यापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेकडे केंद्रात राज्यमंत्रीपद (स्वतंत्र प्रभार) असून ते प्रतापराव जाधव यांना दिले आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे कोणाला संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मंत्री पदासाठी शिवसेनेचे संसदीय नेते डॉ. श्रीकांत शिंदे, विद्यमान मंत्री प्रतापराव जाधव, खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, श्रीरंग बारणे यांची नावे चर्चेत आहेत. प्रादेशिक आणि राजकीय समीकरणे बघून एकनाथ शिंदे याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT