नवी दिल्ली : इंडिया गेटसह राजधानी दिल्लीतील संविधान सदन, नवे संसद भवन आदी इमारती अशा तिरंगांत न्हाऊन निघाल्या आहेत.  Pudhari File Photo
राष्ट्रीय

Independence day | ऑपरेशन सिंदूरमधील शौर्यासाठी जवानांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान

चौघांना कीर्तिचक्र, 15 वीरचक्र, 16 शौर्यचक्र, 60 जणांना सेना पदक

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या सशस्त्र दलांनी अतुलनीय शौर्य दाखवले. दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्याबरोबर पाकिस्तानलाही भारतीय जवानांनी अद्दल घडवली. या शौर्यासाठी जवानांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान करण्यात येणार आहे. सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील जवानांना 127 शौर्य पुरस्कार, 40 विशिष्ट सेवा पुरस्कार दिले जाणार आहेत. याची घोषणा संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी केली. यामध्ये 4 कीर्तिचक्र, 15 वीरचक्र, 16 शौर्यचक्र, 60 सेना पदक, 6 नव सेना पदक, 26 वायुसेना पदके, 7 सर्वोत्तम युद्ध सेवा पदक, 9 उत्तम युद्ध सेवा पदक आणि 24 युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे.

राष्ट्रपतींनी 290 उल्लेखनीय पदक देखील मंजूर केले. यामध्ये लष्करातील 115, नौदलातील 5, हवाई दलातील 167 आणि सीमा रस्ते विकास मंडळातील 3 जणांचा समावेश आहे.

कीर्तिचक्र - 1. कॅप्टन लालरीनवमा सैलो, (पॅरा - लष्कर) 2. लेफ्टनंट शशांक तिवारी (आर्मी सर्व्हिस कोअर), 3. लान्स नाईक मीनातची सुंदरम ए. (द रेजिमेंट ऑफ आर्टिलरी, राष्ट्रीय रायफल्स - लष्कर), 4. शिपाई प्रवीण जंजाळ (महार रेजिमेंट, राष्ट्रीय रायफल्स - लष्कर).

वीरचक्र - कर्नल कोशांक लांबा (302 रेजिमेंट - लष्कर), लेफ्टनंट कर्नल सुशील बिश्त, 1988 (स्वतंत्र) - लष्कर, नायब सुभेदार सतीश कुमार, डोग्रा - लष्कर, रायफलमन सुनील कुमार, जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फ्रट्री - लष्कर, ग्रुप कॅप्टन रंजीत सिंह सिद्धू - हवाई दल, ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा- हवाई दल, ग्रुप कॅप्टन अनिमेश पटनी- हवाई दल, ग्रुप कॅप्टन कुणाल कालरा - हवाई दल, विंग कमांडर जॉय चंद्रा - हवाई दल, स्क्वाड्रन लीडर सार्थक कुमार - हवाई दल, स्क्वाड्रन लीडर सिद्धांत सिंग - हवाई दल, स्क्वाड्रन लीडर रिजवान मलिक - हवाई दल, फ्लाईट लेफ्टनंट अर्शवीर सिंग ठाकूर - हवाई दल, उपनिरीक्षक, मोहम्मद इम्तेयाज - गृहमंत्रालय, सीटी /जीडी दीपक चिंगाखम - गृहमंत्रालय.

शौर्यचक्र - 1. लेफ्टनंट कर्नल नीतेश भारती शुक्ला, शीख रेजिमेंट - लष्कर, 2. मेजर भार्गव कलिता, कुमाऊं रेजिमेंट, राष्ट्रीय रायफल्स - लष्कर, 3. मेजर आशिष कुमार, पॅरा - लष्कर, 4. मेजर आदित्य प्रताप सिंह, राजपूतना रायफल्स - लष्कर, 5. असिस्टंट कमांडंट मोहम्मद शफीक, आसाम रायफल्स - लष्कर, 6. सुभेदार शमशेर सिंह, पॅरा - लष्कर, 7. लान्स नाईक राहुल सिंह, पॅरा - लष्कर, 8. रायफलमन भोज राम साहू, आसाम रायफल्स - लष्कर, 9. लेफ्टनंट कमांडर सूरज प्राशर - नौदल, 10. राम गोयल- लष्कर, 11. विंग कमांडर अभिमन्यू सिंग - हवाई दल, 12. निरीक्षक, लक्ष्मण केवट - गृहमंत्रालय, 13. निरीक्षक, रामेश्वर प्रसाद देशमुख - गृहमंत्रालय, 14. हवालदार सद्दाम हुसैन - गृहमंत्रालय, 15. कॉन्स्टेबल फेदा हुसैन दार - गृहमंत्रालय, 16. कॉन्स्टेबल संजय तिवारी - गृहमंत्रालय.

हवाई दलाच्या 9 जणांना वीरचक्र

ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये असामान्य कामगिरी बजावत शौर्य दाखवणार्‍या हवाई दलातील 9 जणांना वीरचक्र प्रदान करण्यात येणार आहे. पाकिस्तानसोबतच्या संघर्षात हवाई दलाने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. त्यांचा हा सन्मान मानला जात आहे. यापूर्वी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आले होते. 2019 मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या हवाई युद्धादरम्यान पाकिस्तानी एफ-16 विमान पाडण्यात अनन्यसाधारण धैर्य दाखवल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT