Ashwini Vaishnaw on Operation Sindoor
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या अस्मितेचे उदाहरण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी केले. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यासाठीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र दलांनी बजावलेल्या जबरदस्त भूमिकेचे एक महत्त्वपूर्ण प्रदर्शन आहे, असे ते म्हणाले.
२२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात लष्कराने राबवलेले ऑपरेशन हा केवळ देशाच्या धोरणात्मक क्षमतांचा पुरावा नाही. तर केंद्राच्या निर्णायक नेतृत्वाखाली अंमलात आणलेल्या नवीन संरक्षण सिद्धांताचे देखील प्रतिबिंब आहे, असे ते म्हणाले. हा देशासाठी एक प्रशंसनीय विकास आहे, असेही ते म्हणाले.