नवी दिल्लीः भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्न सुरु आहेत. असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव करोलिन लिविट यांनी सांगितले आहेत. त्यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की ' भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमिवर आमचे परराष्ट्र मंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो हे सक्रियपणे सहभागी झाले आहेत. तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे शक्य तितक्या लवकर शांत व्हावे, याची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्राध्यक्षांचे दोन्ही देशांच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो सतत दोन्ही देशांच्या नेत्यांशी संपर्कात आहेत आणि हा संघर्ष संपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. असेही त्या पुढे म्हणाल्या आहेत.
भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ उत्तरेकडील बारामुल्ला ते दक्षिणेकडील भूज पर्यंत, २६ पाकिस्तानी ड्रोन दिसून आले आले आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ हे ड्रोन दिसले आहेत. यामध्ये नागरी आणि लष्करी तळांवर हल्ला करणारे ड्रोन समाविष्ट असल्याची माहिती मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर असलेली बैठक संपली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल व परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत जवळपास दीड तास ही बैठक सुरु होती.
पंजाबमध्ये फिरोजपुर येथे पाकिस्तानने केलेल्या एका ड्रोन हल्यामध्ये ३ लोक जखमी झाले असल्याची माहीती समोर आली आहे. हे ड्रोन भारतीय सैन्याने पाडले होते ते एका घरावर पडल्याने घरातील ३ लोक भाजले आहते. फिरोजपुरचे पोलिस अधिक्षक भूपींदर सिंग यांनी माहिती दिली की जखमींना रुग्णालयात भरती केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याठिकाणी अनेक ड्रोन पाडण्यात आले आहेत.
राजस्थानच्या बाडमेर मध्ये हाय हलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर पंजाबच्या होशियारपूर व तरनतारन येथे पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो भारतीय सैन्याने हाणून पाडला.
केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डांनी आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठकीत आरोग्य व्यवस्थेच्या तयारीचा आढावा घेतला. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय तयारीची सद्यस्थितीची माहिती अधिकाऱ्यांनी त्यांना दिली. रुग्णवाहिका, वैद्यकीय उपकरणे, औषधे, रक्त पुरवठा आणि इतर वैद्यकीय वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करावे, असे आदेश आरोग्य मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बेड, आयसीयू आणि एचडीयू यासारख्या वैद्यकीय सेवांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यास त्यांनी सांगितले.
रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांना आवश्यक औषधे, रक्त, ऑक्सिजन, ट्रॉमा केअर किट इत्यादींची उपलब्धता सुनिश्चित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एम्स नवी दिल्ली आणि इतर केंद्र सरकारी रुग्णालयांनी डॉक्टर आणि परिचारिकांना सज्ज राहण्यास सांगावे, असे नड्डा म्हणाले. आपत्कालीन प्रतिसाद जाळ्याला बळकट करण्यासाठी राज्य आणि जिल्हा प्रशासन, सशस्त्र दल आणि डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिक्स, खाजगी क्षेत्रातील रुग्णालये, धर्मादाय संस्था इत्यादींच्या प्रादेशिक संघटनांशी समन्वय साधण्याचा सल्ला मंत्र्यांनी दिला.
जम्मू काश्मिरमधील उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा गोळीबार सुरू केला आहे. उखळी तोफांचा मारा सुरू आहे. गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. पूंछ मध्येही गगोळीबार सुरू आहे. जम्मू विमानतळ परिसरात सायरनचे आवाज ऐकू आल्याचे सांगितले जात आहे.
सांबा, अखनूर, उरी सेक्टरमध्ये ब्लॅकआऊट केला गेला आहे. दरम्यान, राजस्थानातील जैसलमेर येथे खबरदारी म्हणून पूर्ण ब्लॅकआऊट करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सशस्त्र दलांच्या माजी सैनिकांच्या एका गटाशी भेट घेतली. पंतप्रधानांनी सध्याच्या परिस्थितीविषयी विविध मुद्द्यांवर माजी सैनिकांशी सविस्तर चर्चा केली.
या भेटीत माजी वायुदलप्रमुख, लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि देशाची दीर्घकाळ सेवा केलेले इतर माजी सैनिक सहभागी झाले होते.
केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत एक सविस्तर आढावा बैठक घेतली. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, सोनोवाल यांनी महत्त्वाच्या सागरी प्रकल्पांचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना व्यवसाय पूर्ववत सुरू राहील याची खात्री करण्याचे निर्देश दिले.
तसेच मालवाहतूक सुरळीत आणि सामान्य राहावी यासाठीच्या उपाययोजनांचाही आढावा घेतला.
संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारची रजा वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त मंजूर करण्यात येणार नाही.
याशिवाय, याआधी मंजूर केलेल्या रजा रद्द करण्यात येत असून, जे अधिकारी सध्या रजेवर आहेत त्यांनी तत्काळ आपल्या ड्यूटीवर परत हजर रहावे," असे आदेश आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काढले आहेत.
गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी भारत-पाक सीमेवरील आणि देशातील विमानतळांच्या सुरक्षेचा उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.
या बैठकीला केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका, बीएसएफ, सीआयएसएफ आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक उपस्थित होते.
भारतीय सैन्याने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न पाकचा प्रयत्न उधळून लावल्याच्या काही तासांतच ही बैठक झाली, असे सूत्रांनी सांगितले.
भारत-पाकिस्तान सीमेचे रक्षण बीएसएफ करते, तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) देशातील विमानतळांचे, मेट्रो नेटवर्कचे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचे रक्षण करते. त्यामुळे सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले, भारताने 4 ड्रोनद्वारे प्रतिहल्ला केला. काल मध्यरात्री पाकिस्तानने कुरापत काढली.पाकिस्तानच्या हल्ल्यात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानने गुरूद्वारावर हल्ल्याचा प्रयत्न केला. पण गुरूद्वारावर पाकचा हल्ला केला नाही असा दावा पाकिस्तान केला आहे. पण तो खोटा आहे
मिसाईल हल्ला करताना पाकिस्तानने हवाई हद्दीतील नागरी विमानांची वाहतूक बंद केली नाही. पाकिस्तान नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून करत आहे. भारताने पाकचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले, पाकिस्तानने गुरूवारी मध्यरात्री भारतात हल्ल्याचााप्रयत्न केला. पाकने तुर्कीए बनावटीचे 300 ते 400 ड्रोन पाठवले. ड्रोनद्वारे भारतीय सैनिकांना टारगेट करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारताची एकता हे पाकिस्तानसाठी एक आव्हानच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या की, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. आंतरराष्ट्रीय सीमा तसेच लाईऩ ऑफ कंट्रोलवर पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आले.
पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकच्या चार एअर डिफेन्स साईटवर हल्ला केला.
36 ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न पाकिस्तानने केला. तो भारतीय सशस्त्र दलांनी हाणून पाडला. एलओसीवर पाकिस्तानने गोळीबार केला. भटिंडा मिलिटरी स्टेशनवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.
ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी, थल सेनेतील कर्नल ससोफिया कुरेशी आणि एअरफोर्समधील विंग कमांडर व्योमिका सिंग हे तीन अधिकारी पत्रकार परिषद घेऊन सैन्य कारवाईची माहिती देत आहेत. शुक्रवारी सायंकाळीही पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.
जम्मू-काश्मिरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LOC) राहणाऱ्या नागरिकांनी गुरूवारी रात्री पाकिस्तानकडून झालेल्या जोरदार गोळीबार आणि ड्रोन तसेच क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या प्रयत्नांनंतर सुरक्षित भागांकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.
भारताच्या वायुसुरक्षा यंत्रणेमुळे हे सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले अडवण्यात आले आणि निष्फळ ठरवण्यात आले. मात्र पाकिस्तानकडून रात्रीभर सुरू असलेल्या सीमा पार गोळीबारामुळे LOC जवळील अनेक निवासस्थानी मोठे नुकसान झाले आहे.
सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने, केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे जिल्हाधिकारी यांनी लग्न समारंभ, धार्मिक उत्सव आणि इतर सण-उत्सवांदरम्यान फटाके (सर्व प्रकारच्या फटाक्यांसह) फोडण्यावर बंदी घातली आहे. 9 मे 2025 ते 7 जुलै 2025 या काळासाठी ही बंदी घालण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सायरन चाचणीबाबत दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मंत्री प्रवेश वर्मा म्हणाले, “शुक्रवार रात्रीपासून दिल्लीतील उंच इमारतींमध्ये आणखी 40 ते 50 सायरन बसवले जाणार आहेत.
हे सायरन आपत्कालीन परिस्थितीत वापरले जातील. सर्व सायरन बसवण्यासाठी 1-2 दिवस लागतील. दिल्ली सरकार, पोलीस आणि लष्कर सर्वजण पूर्णपणे सज्ज आहेत.
दिल्ली विमानतळाच्या सूत्रांनुसार, 9 मे रोजी अनेक विमानतळ बंद असल्यामुळे आतापर्यंत रद्द झालेल्या विमानांची संख्या खालीलप्रमाणे आहे:
आंतरराष्ट्रीय आगमन – 4
आंतरराष्ट्रीय प्रस्थान – 5
देशांतर्गत आगमन – 63
देशांतर्गत प्रस्थान – 66
दरम्यान, दिल्ली विमानतळ कार्यरत आहे. फक्त काहीच विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
उरीतील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले, "पाकिस्तानकडून प्रयत्न झाले. भारतीय सशस्त्र सेना कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास पूर्णपणे सज्ज आहे.
जम्मू-काश्मीर प्रशासन हे सुनिश्चित करत आहे की येथील नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. मी सीमावर्ती भागांतील त्या गावांना भेट दिली जिथे नुकसान झाले आहे.
जखमी आणि मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदतनिधी (एक्स-ग्रेशिया) देण्यात आला आहे. नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे. नवीन बंकरांची गरज भासणार आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत ते बांधले जातील."
पुणे : सर्व प्रसार माध्यमाना संरक्षण कारवाया आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे लाईव्ह कव्हरेज किंवा रिअल-टाइम रिपोर्टिंग टाळण्याचा सल्ला देण्यात भारतीय संरक्षण मंत्रालयाने दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संवेदनशील किंवा स्रोत-आधारित माहितीचे प्रकटीकरण धोका निर्माण करू शकते आणि जीव धोक्यात आणू शकते.
यात कारगिलयुद्ध, 26/11 रोजीचे हल्ले आणि कंदहार अपहरण यासारख्या भूतकाळातील घटना अकाली रिपोर्टिंगचे धोके अधोरेखित करतात.
केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (सुधारणा) नियम, 2021 च्या कलम 6(1)(पी) नुसार, दहशतवादविरोधी कारवायांदरम्यान नियुक्त अधिकाऱ्यांकडून केवळ नियतकालिक ब्रीफिंगला परवानगी आहे.
सर्व भागधारकांना राष्ट्राच्या सेवेत सर्वोच्च मानकांचे पालन करून कव्हरेजमध्ये दक्षता, संवेदनशीलता आणि जबाबदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत (तांदूळ, गहू, साखर, इंधन इत्यादी) जीवनावश्यक वस्तूंच्या साठवणुकीवर बंदी घातली आहे.
व्यापाऱ्यांनी सध्याचा साठा अन्न व पुरवठा विभागाकडे 3 दिवसांच्या आत जाहीर करावा," असे आदेश देण्यात आले आहेत.
परराष्ट्र मंत्री जयशंकर हे गुरूवारी रात्रीपासूनच जगभरातील विविध महत्वाच्या नेत्यांशी संपर्कात आहेत. या सगळ्यांशी बोलून जयशंकर यांनी भारताची भूमिका आणि पाकिस्तानचा हेकेखोरपणा सांगितला आहे. तसेच भारत सडेतोड प्रत्युत्तर देईल, असेही म्हटले आहे.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी युकेचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅम्मी (David Lammy) जयशंकर यांची फोनवरून चर्चा झाली. आमच्या चर्चेचा केंद्रबिंदू दहशतवादविरोधी उपाययोजनांविषयी होता, ज्यामध्ये झीरो टॉलरन्सचे धोरण आवश्यक असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.
जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही सांबा येथील स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभुमीवर या नागरिकांना त्यांचे निवासस्थान सोडावे लागले आहे. त्यांची व्यवस्था सांबा येथे केली गेली आहे. सीमावर्ती भागांतील नागरिकांसाठी सांबा येथे कॅम्प उभारण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, "आम्ही शक्य तितकी सर्व मदत करत आहोत. दररोज तीन वेळा अन्न दिले जाते, स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध आहेत, सर्व शिबिरांमध्ये डॉक्टर उपलब्ध आहेत, रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे राहणाऱ्यांना शक्य तितक्या कमी अडचणींचा सामना करावा लागावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."
जम्मू-काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी उरी सेक्टरमधील गिंगाल येथील रहिवाशांची भेट घेतली. त्यांनी रहिवाशांशी त्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या सध्याच्या गरजांबाबत चर्चा केली. पाकिस्तानने गुरूवारी रात्री उखळी तोफांच्या मारा केल्याने येथील अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरातमधील जिल्ह्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
जम्मूमध्ये पाक सीमेवर ७ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली मोठी बैठक सुरू आहे. या बैठकीत सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही लष्करप्रमुख सहभागी झाले आहेत.
पठाणकोटमध्ये काल रात्री शहरातील लष्करी तळाला पाकिस्तानी ड्रोनने लक्ष्य केल्यानंतर पोलिस आणि लष्कराने परिसरात शोध मोहीम राबवली.
जम्मू आणि काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने केलेल्या जोरदार गोळीबारात एक महिला ठार झाली आणि तिच्या कुटुंबातील दोन सदस्य जखमी झाले.
भारताकडून झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय भागीदारांना अधिक कर्जासाठी आवाहन केले आहे. वाढत्या युद्ध आणि साठ्यातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय भागीदारांना तणाव कमी करण्यास मदत करण्याचे आवाहन करतो, असे पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
भारत-पाकिस्तान तणाव वाढण्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सशस्त्र दल प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक बोलावली आहे. वरिष्ठ पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील.
पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने दिलेल्या जलद प्रत्युत्तराचे अखनूरच्या रहिवाशांनी कौतुक केले.
जम्मू आणि काश्मीर : पाकिस्तानने रात्रभर केलेल्या गोळीबारात अनेक दुकाने आणि घरांचे नुकसान झाले.
सीडीएस आणि तिन्ही लष्करप्रमुख संरक्षण मंत्रालयात पोहोचले आहेत. थोड्याच वेळात राजनाथ सिंह यांच्याशी बैठक होणार आहे. दरम्यान, लष्कर सीमेवर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे.
काल रात्री झालेल्या पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री जम्मूला जात आहेत.
राजस्थानातील जैसलमेरमधील रामगड येथील बीएसएफ कॅम्पवर पहाटे ४.३० ते ५.३० वाजेपर्यंत ड्रोनने हल्ला करण्याचा आणखी एक प्रयत्न झाला, जो हवाई संरक्षण यंत्रणेने पाडला.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज आणि उद्या जम्मू-काश्मीरमधील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
India Pakistan War Live Updates |
दिल्ली : भारताकडून आधी 'ऑपरेशन सिंदूर' आणि त्यापाठोपाठ केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे सैरभैर झालेला पाकिस्तान हादरला आहे. एकीकडे गृहकलह, दुसरीकडे भारताचा भीषण हल्ला आणि ढासळलेली अर्थव्यवस्था अशा कात्रीत सापडलेल्या पाकिस्तानने विद्यमान लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पदावरून हटविले आहे. पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला. पण भारताने एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून हे हल्ले हाणून पाडले.
गरूवारी रात्री पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या भारतातील अनेक भागात अनेक ड्रोन डागले, परंतु भारतीय सैन्याने ५० हून अधिक पाकिस्तानी ड्रोन हवेत पाडले. एल-७० तोफा, झू-२३ मिमी, शिल्का सिस्टीम आणि इतर प्रगत उपकरणांनी पाकिस्तानचे हल्ले उद्ध्वस्त केले.