Operation Sindoor
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने (जेएनयू) तुर्कीच्या विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार बुधवारी स्थगित केला. देशभरात तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु झाली आहे. कारण, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षामध्ये तुर्कीने पाकसोबत असल्याचे घोषित केले. त्याबरोबर तुर्की पाकिस्तानला मोठी मदत करत आहे. पाकिस्तानने तुर्कीचे ड्रोन वापरुन भारतावर हल्ले केले.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) ‘एक्स’वर पोस्ट करुन सामंजस्य करार स्थगित केल्याची घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव, जेएनयू आणि इनोनू विद्यापीठ, तुर्की यांच्यातील सामंजस्य करार पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे, असे विद्यापीठाने म्हटले.